Posts

Showing posts from April, 2018

राणी आणि मनू चा साहसी प्रवास - भाग १

Image
  राणी साहेब उठा, राणीला उठवायला आलेली दासी राणीसाहेबाना आधीच तयार झालेले पाहून अचंबित झाली. रोज उठवल्या शिवाय न उठणारी राणी आज कोणाच्या हि मदती शिवाय उठून तयार झाली होती. राणी तशी लहानच पण कुणीही वारीस नसल्याने हि 18 वर्षाची राणी गादीवर बसलेली. १8 वर्षाची असून हि ती खूप कर्तबगार आणि चांगली, प्रजेची खूप लाडकी. आज राणी लवकर उठून स्वतः तयार झाली याला कारण हि तसेच होते. आज तिचा खास दिवस होता. आज ती पुन्हा लहान होणार होती. आज ती जवळच्या राज्यात असलेल्या आपल्या मैत्रीणीस भेटायला जाणार होती. जाणे जरुरी होते कारण आज तिचा वाढदिवस आणि दोघीनीं ठरवल्या प्रमाणे हा त्यांचा दिवस काहीतरी निराळे करण्याचा. राणी आणि जवळच्या राज्याची राजकुमारी मनू , तिचे नाव मानसी पण राणीची ती मनू, ह्या दोघी जिवलग मैत्रिणी, एकाच शाळेत शिकलेल्या. शाळेत खूप दंगा मस्ती करणाऱ्या मैत्रिणी. पण राणीवर जबादारी आली आणि दोघींना भेटणे हि मुश्किल झाले. मग या दोघीनीं ठरवले काहीहि झाले तरी एकमेकिंच्या वाढदिवशी भेटायचे आणि सगळे पाश झुगारून खूप मस्ती करायची, मनासारखे वागायचे, ह्या दिवसाची आठवण म्हणून काहीतरी साहसी करायचे. दोघी मैत्र